Ad will apear here
Next
‘विठूमाऊली’ टीमची पावसाळी सहल उत्साहात
मुंबई : एखाद्या दिवशी अचानक सुट्टी मिळावी आणि सहजच एखादा सहलीचा प्लॅन ठरावा असे फार क्वचित घडते; मात्र, हे जेव्हा घडते तेव्हा ती सहल कायमच लक्षात राहते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘विठूमाऊली’ मालिकेच्या टीमला अशीच एक धम्माल सहल करण्याची संधी नुकतीच मिळाली. सुट्टी मिळताच ‘विठूमाऊली’च्या टीमने थेट भंडारदरा गाठले आणि वर्षा सहलीचा आनंद घेतला.

उद्याचे शूट रद्द झाल्याची माहिती ‘विठूमाऊली’च्या टीमला आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता समजली. अचानक मिळालेली ही सुट्टी सत्कारणी लावावी या विचारातून नियोजन सुरू झाले आणि इतर काही करण्यापेक्षा मस्त पावसाळी सहल करावी, यावर सगळ्या टीमचे एकमत झाले. सुट्टीच्या दिवशी भंडारदरा गाठत तिथल्या जवळच्या भावली गावात जाऊन ‘विठूमाऊली’ टीमने पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.

‘आम्ही सर्वांनी खूप धम्माल केली, कामाचा शीण विसरायला लावून नवी ऊर्जा देणारी ही एक दिवसाची सहल होती,’ अशी प्रतिक्रिया ‘विठूमाऊली’ साकारणाऱ्या अजिंक्य राऊतने दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZJNBP
Similar Posts
‘विठूमाऊली’तून उलगडणार वारीचा इतिहास मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतून उलगडणार आहे
‘विठूमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपतीबाप्पा मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘विठूमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपतीबाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरे आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपतीबाप्पांचे आगमन होणार आहे.
‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’चे रूपेरी यश मुंबई : टेलिव्हिजन आणि जाहिरात क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘प्रोमॅक्स अॅवॉर्ड्स’मध्ये ‘स्टार प्रवाह’ने बाजी मारली आहे. ‘विठूमाऊली’च्या बेस्ट मार्केटिंग कॅम्पेनसाठी रौप्यपदक आणि ‘शतदा प्रेम करावे’च्या बेस्ट प्रोमोसाठी रौप्यपदक हे दोन पुरस्कार ‘स्टार प्रवाह’ने पटकावले. या पुरस्कारांच्या निमित्ताने
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language